जळगाव जिल्हा
पाचोरा तालुक्यातील २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील एका गावातून २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. तिच्या पतीने दिलेल्या खबरीवरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील एका गावातून २७ वर्षीय विवाहिता ही कुणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिचा आजपावेतो शोध घेतला असता मिळून न आल्याने अखेर तिच्या पतीने पोलिसात खबर दिल्यावरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता विवाहितेचा शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची ५ फूट २ इंच, अंगात लाल रंगाची साड़ी, कपाळावर टिकली गोंदलेली, दोन्ही कानास जुन्या जखमा असे वर्णन असून कोणास आढळून आल्यास पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. हरीश अहिरे करीत आहेत.