नवी मुंबई-
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाने व नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या प्रेरणेने 22 जुलै सोमवार रोजी शिक्षण सप्ताह चा पहिला दिवस TLM DAY मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या शिक्षण सप्ताहाच्या पहिला दिवसाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांनी उत्कृष्टरित्या केले होते. या शिक्षण सप्ताह पहिल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उस्फूर्तरीत्या सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक सारिका पाटील ,महादेव तोंडे , संध्या झाकणे,मंदा पिंगळे ,विकी मोरे यांनी योग्यरीत्या मार्गदर्शन केले.