सराईत मोटार सायकल व सायकली चोरी करणाऱ्यांचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने आवळ्या मुसक्या…
जळगाव-
जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे होत असल्यानेपोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त १) पोउनि.राहुल तायडे, सफौ/विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ/सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ/अक्रम शेख याकुब, पोहेकॉ/लक्ष्मण अरुण पाटील, पोकॉ/जितेंद्र सुरेश पाटील, भुषण शेलार, चालक पोहेकॉ/दिपक चौधरीअशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना मोटार सायकल व सायकल चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपीतांबाबत माहिती काढून त्यांचे शोध घेवून मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत योग्य ते मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्याप्रमाणे वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोटार सायकल चोराटा आरोपी यांचे जळगाव शहरातील विविध ठिकाणचे CCTV फुटेज बघून त्याप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी अमोल बेलप्पा आखाडे (रा.खेडी ता.जळगाव) हा दिसत असल्याने त्याचे ठाव ठिकाणाची माहिती काढून त्याच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून वरील संशयीत आरोपीस दि.२५/०७/२०२४ रोजी शिताफिने ताब्यात घेतले. त्यास मोटार सायकल व सायकल चोरी बाबत कसुन विचारपुस करता त्याने
जळगाव शहरातील एकूण १४ मोटार सायकल व १९ सायकल चोरी केल्याचे सांगितले. सदर मोटार सायकली हया भुषण जगन्नाथ माळी व विशाल विश्वनाथ माळी ( दोन्ही रा. वरणगाव ता. भुसावळ) यांना दिल्या असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे वरील पथक वरील संशयीत आरोपीस वरणगाव येथे घेवून गेले असता १) भुषण जगन्नाथ माळी (वय – ४०) व विशाल विश्वनाथ माळी (वय -२८)( दोन्ही रा. वरणगाव ता. भुसावळ) यांचे कडून एकूण १४ मोटार सायकली एकूण ५,४०,०००/- रुपये किमतीच्या व एकूण १९ सायकल एकूण ४४,५००/- रुपये किमतीच्या असा एकूण ५,८४,५००/- रुपये किमंतीच्या मोटार सायकल व सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिक्षम घेवून रेकॉर्ड वरील आरोपी अमोल बेलप्पा आखाडे ऊर्फ अर्जुन वाणी (वय- ४२)( रा. दादाजी दरवाज्या जवळ, खेडी ता. जि. जळगाव)यास शिताफिने ताब्यात घेवून त्याने चोरी केलेल्या मोटार सायकली व सायकली हया त्याने दिलेल्या भुषण जगन्नाथ माळी (वय-४०) व विशाल विश्वनाथ माळी ( वय-२८)( दोन्ही रा. वरणगाव ता. भुसावळ) यांचे कडुन वरील प्रमाणे मोटार सायकली व सायकली हस्तगत करुन चांगली कामगिरी केलेली आहे. सदर आरोपीतास पुढील कार्यवाहीसाठी
जिल्हापेठ पो.स्टे. गु.र.नं. १७६ / २०२४ भादंवि क. ३७९ या गुन्हयांत देण्यात आलेले आहे. सदर आरोपीता कडून जळगाव जिल्हयातील पोलीस स्टेशन दाखल असलेल्या ६ गुन्ह्यातील मोटारसायकल व १९ सायकली तसेच बाहेर जिल्ह्यातील ८ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन सर्व टीमचे प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले