माधव सेवा प्राथमिक विद्या मंदिरात ‘ शिक्षण सप्ताह ‘निमित्त विविध उपक्रम
जळगाव-
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने शिक्षण सप्ताहाचे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत मानव सेवा प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे विविध उपक्रम घेण्यात आले.
यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी म्हणून प्रथम दिवशी एल.सी.डी.प्रोजेक्टर ,स्मार्ट टि.व्ही.द्वारा अध्ययन -अध्यापन करण्यात आले.तसेच विविध अध्ययन – अध्यापन साहित्य विद्यार्थ्याना ग्रुप मध्ये देऊन अभ्यास पुरक अॅक्टीव्हीटी करुन घेण्यात आल्या.
मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस निमित्त मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त व्हावी म्हणून विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्याचे आनंददायी गणितीय अध्यापन घेण्यात आले प्रसंगी ‘ निपुण प्रतिज्ञा ‘ घेण्यात आली.
क्रीडा दिवस निमित्त बौध्दिक व पारंपारिक खेळ घेण्यात आले.प्रसंगी देशी खेळांना प्रोत्साहान देण्यात आले.विविध खेळ घेऊन विद्यार्थ्याचा आनंद व्दिगुणित करण्यात आला. तसेच खेळण्याचे फायदे,महत्व, आहार,स्वच्छता या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थी शारिरीक, मानसिक, सामाजिक, भावनिक दृष्ट्या, तंदुरुस्त व्हावा म्हणून विविध खेळ घेण्यात आले.सांस्कृतिक दिन साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यानी पर्यावरण आधारित गाणी,गोष्टी, नृत्य, कविता, नाटक सादर केले. तसेच कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्याशी कलाकाराची मुलाखत या सदराअंतर्गत इ.7 वीच्या विद्यार्थ्यांनीने संवाद साथुन मुलाखत घेतली.कौशल्य व तंत्रज्ञान दिवस अंतर्गत कागदी पिशवी बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच प्रोजेक्टर वर ऐतिहासिक स्थळे दाखवण्यात आले. त्याचे ‘जतन व्हावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता, बागकाम प्रात्यक्षिक करुन घेतले.
इको क्लबचा माध्यमातून पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थी, मातापालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी विदयार्थ्यांना देण्यात आली. शालेय पोषण आहार सोबत गोड पदार्थ देऊन भोजन करण्यात आले.
अशा प्रकारे ‘ शिक्षण सप्ताह विविध अभ्यास पुरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सदर उपक्रम मुख्याध्यापिका माया अंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद यांनी उपक्रम घेतले.