शिवसेना (उबाठा) आघाडीची कार्यकारणी जाहीर
भडगाव-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुका शिवसेना नेत्या सौ.वैशाली सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते गणेश परदेशी, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, उपजिल्हा प्रमुख पुष्पा परदेशी, उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, तालुका प्रमुख जे. के. पाटील, विधान सभा क्षेत्र प्रमुख रतन परदेशी, शहर प्रमुख शंकर मारवाडी यांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उबाठा) महिला आघाडी तालुका व शहर कार्यकारणी नियुक्ती प्रमाण पत्र देवून कार्यकारिणी जाहीर केली आहे.
नविन कार्यकारिणी
योजना पाटील (तालुका प्रमुख), उषा परदेशी (उपतालुका प्रमुख), ज्योत्स्ना पाटील (विधानसभा क्षेत्र समन्वयक), सिंधू वाघ (तालुका समन्वयक), सविता चौधरी (शहर प्रमुख भडगांव विभाग), रिना पाटील (शहर प्रमुख टोणगाव नवे शहर विभाग), सुषमा भावसार (शहर प्रमुख यशवंतनगर विभाग), सुरेखा वाघ (शहर प्रमुख कराब वढदे विभाग), रेखा शिरसाठ (उप शहर प्रमुख यशवंतनगर विभाग), गायत्री पाटील (उप शहर प्रमुख कराब वढदे विभाग), सोनाली पाटील (उपशहर प्रमुख), नसीम बानो पठाण (शहर प्रमुख अल्पसंख्यांक आघाडी), जिजाबाई चव्हाण (उप शहर प्रमुख अल्पसंख्यांक आघाडी), निता भांडारकर (शहर समन्वयक), मनीषा पाटील (उपशहर समन्वयक), वैशाली अमृतकर (उपशहर समन्वयक), मिनाक्षी पाटील, (उपशहर समन्वयक) सदर नूतन कार्यकारणीस उप जिल्हा समन्वयक गोरख पाटील, मा. नगराध्यक्ष प्रशांत पवार, पंस माजी सभापती रामकृष्ण पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकरी माधव जगताप, युवासेना तालुका प्रमुख चेतन रविंद्र पाटील, शहर प्रमुख चेतन रंगनाथ पाटील, नगरसेवक भिकनुर पठाण, राजू देशमुख, इसाक मलिक, सुभाष पाटील तसेच शिवसेना, युवासेना सह सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्यात.