16 ऑगस्ट रोजी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्या बाबत डॉ.निलकंठ पाटील यांनी दिले निवेदन..
पाचोरा-
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये खुप मोठ्या प्रमाणावर जिहादी धर्मविरोधाकडून तसेच धार्मिक हिंसाचार उफळुल आला असून धार्मिकतचे आधारावर तेथील हिंदूना लक्ष करून त्यांचेवर अतोनात असे अत्याचार सुरू आहे. इतकेच नाही तर हिंदूचे मंदिरांची तोडफोड तसेच हिंदू देवी देवतांची विटबंना केली जात असल्याचे आपण सर्वत्र बघत आहोतच. परंतू सदरील घटनेत हिंसाचार जिहादच्या नावाखाली हिंदूचे महिलांचे दिवसाढवळ्या बलात्कार तसेच त्यांच्या शरिराचे लचके तोडले जात असून, त्यांचे अंगावरील कपड्यांचे देखील अतिशय घाणेरड्या स्वरूपात प्रदर्शन करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. तसेच तेथील हिंदूना मारून त्यांचे प्रेते भर चौकात लटकविले असल्याचे देखील चित्र आज आपणास सर्वत्र बघायला मिळत असून हे प्रकार तेथील जिहादी संघटना व समुदाय घडवून आणत असल्याचे निदर्शनास येत असून हिंदूचे खुप मोठ्या प्रमाणावर धर्माच्या नावाखाली नरसंहार सुरू असून यावर सकल हिंदूनी लक्ष देवून सदरील बाबत ही गांर्भीयाने घेणे गरजेचे आहे.
तरी सदरील होत असलेल्या घटनेच्या बाबतीत संपुर्ण जळगांव जिल्हयात दि. १६/०८/२०२४ वार शुक्रवार रोजी पुर्ण दिवसभर हिंदू एकतेचा संदेश तसेच त्या ठिकाणी होत असलेल्या हिंसाचाराचे विरोधात जिल्हा जळगाव बंदचे आवाहन सर्व साधु संत महंत तथा सर्व संप्रदायाचे संतगण यांनी दि. १०/०८/२०२४ रोजी पत्रकार परिषद घेवून जाहिर केलेले आहे. यात सर्व सकल हिंदूनी पुढाकार घेवून आपली नैतीक जबाबदारी लक्षात घेवून येत्या १६ तारखेला संपुर्ण जळगांव जिल्हा बंद ठेवायचा असून आपले पाचोरा शहर तसेच ग्रामिण भागात देखील पुर्णपणे शांततेच्या मार्गाने बंदचे आवाहन केले जात आहे.
आपण हि दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी बाजार समिती बंद पाळवा आणि शेतकरी दळणवळण बंद असेल असे जाहीर करावे जेणेकरून शेतकरी बांधव यांना अडचण होणार नाही हि विनंती निवेदनाद्वारे वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. निलकंठ पाटील यांनी केली आहे.