भडगाव येथे शालेय विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणासाठी बेसिक कराटे प्रशिक्षण कॅम्प संपन्न.
भडगाव-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्थेचे, संस्थापक चेअरमन, कर्मवीर, तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या, २२ व्या ‘पुण्यस्मरण सप्ताह’ निमित्ताने, संस्थेच्या सचिव, डॉ. पुनमताई प्रशांतराव पाटील, यांच्या संकल्पनेतून, नुकतीच तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या अमानुष घटना व सामाजिक विकृतींपासून मुलींना प्रसंगी, स्वतःचे संरक्षण करता यावे, म्हणून,भडगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या, शालेय विद्यार्थिनीसाठी, ‘बेसिक कराटे प्रशिक्षण कॅम्प’ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले.
डॉ.पूनमताई पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलेत. त्या नंतर भडगाव येथील कराटे प्रशिक्षक, अबरार सर, शाहरुख मण्यार, अबुल खान आणि टीम यांनी, मुलींना समय सूचकता दाखवून, स्वतःचे संरक्षण कसे करता येईल ? याबद्दल विविध कराटे प्रात्यक्षिके दाखवून, विद्यार्थ्यीनिंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.व मुलींनीही स्वतः कराटे मध्ये सहभागी होत, कराटे प्रात्यक्षिकां चा अनुभव घेतला. लाडकूबाई विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. वैशालीताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. सौ. पूनमताईं पाटील यांच्या मागणीवरून कराटे प्रशिक्षक आबरार सर आपल्या संस्थेतील प्रत्येक शाखेवर जाऊन शनिवारी रोटेशन पध्दतीने कराटे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिलेत व हा उपक्रम सतत चालू राहणार आहे,हि आपल्या संस्थेसाठी आनंदाची बाब आहे.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, कमलेश शिंदे आर. आर. वाळखंडे एस. एच. पाटील बी.जे. पाटील अभिजीत सिसोदे ए. पी. बागुल एस. एन. पाटील विलास पाटील सर,राहुल जाधव उपस्थित होते.
कु.साक्षी देशमुख ,लाडकूबाई विद्या मंदिर भडगाव, जागृती नेमाडे इंग्लिश मीडियम स्कूल, भडगाव, गायत्री पाटील साधनाताई पाटील विद्यामंदिर आमडदे, कु. निलम पटेल वडजी कु रविशा चिंचोरे, गिरड हायस्कूल या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्रीमती देवरे मॅडम, यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होणेसाठी, लाडकूबाई विद्या मंदिर, सह शालेय समिती, तसेच संस्थेतील क्रीडा शिक्षक, एस. ए. वाघ सर,सतिष पाटील, सावंत सर,डी.एस. पाटील, आर. पी. पाटील, अमोल पाटील, राकेश पा,पवार सर संदिप पाटील तसेच महिला शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.आभार.सौ. वैशाली बिऱ्हाडे यांनी मानलेत.