वैशालीताई आमच्या समस्या सोडवा;
चिंचखेडा खुर्द ग्रामस्थांचे साकडे
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातल चिंचखेडा खुर्द येथील ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत असून वैशालीताई सुर्यवंशी यांनी याचे निराकरण करावे असे साकडे तेथील ग्रामस्थांनी शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान टाकले.
पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा खुर्द येथे सोमवारी 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तात्यासाहेब आर ओ तात्या पाटील यांच्या कार्यकाळातील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधत तात्या साहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तर याप्रसंगी गावातील विविध समस्यांचा उहापोह देखील करण्यात आला. यात प्रामुख्याने गावातील मोची वाडा परिसरातील मोठ्या नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करत संरक्षणासाठी कठडेही बांधण्यात यावे अशी मागणी येथील समाज बांधवांनी केली त्यावर त्यांनी त्यांना समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्त्यांसह अन्य मागण्या देखील पूर्ण करण्याची विनंती गावकऱ्यांनी केली. यावर देखील कार्यवाही करण्याची ग्वाही वैशालीताईंनी दिली.
या गावातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी गावातील महिला ग्रामस्थ यांच्याकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याप्रसंगी गावातील शालिक भूषण पाटील, पितांबर कौतिक पाटील, संजय पाटील, शेखर पाटील, प्रदीप पाटील, रमेश लोंढे, बाळकृष्ण पाटील, निंबा पाटील, रामलाल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
तर आजच्या यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव मराठे, ॲड. अभय पाटील, गजू पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, प्रमोद नाना पाटील, संदीप जैन, नामदेव चौधरी, तिलोत्तमा मौर्य, कुंदन पाड्या, अरुण तांबे, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, जयश्री येवले, उषा परदेशी, बेबाबाई पाटील, नीता भंडारकर, मनीषा पाटील, अरुण तांबे, आवेश खाटीक, नाना भिमसिंग पाटील, विजय आनंदा पाटील, पी. एन. पाटील, अण्णा कोळी, विश्वास पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, प्रणित पाटील, शरद पाटील, सदाभाऊ चौधरी, अनिल सावंत, मनोज चौधरी, शशी पाटील, शशिकांत बोरसे, योजना पाटील, जयश्री येवले, लक्ष्मी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.