जळगाव जिल्हाशैक्षणिक

पाचोरा येथील माध्यमिक कन्या विद्यालयाचा निकाल 99%


पाचोरा-


येथील विश्वासराव पवार ट्रस्ट नगरदेवळा संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेचा यंदाचा एस. एस. सी. परीक्षा 2024, (इयत्ता. दहावीचा) निकाल 98.61 टक्के एवढा लागला आहे. एस.एस.सी. परीक्षेत प्रविष्ट झालेल्या 72 पैकी 71 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी पैकी 21 मुली  गुणवत्ता यादीत, 35 मुली प्रथम श्रेणीत, 13 मुली द्वितीय श्रेणीत तर दोन विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. या घवघवीत यशाबद्दल विश्वासराव पवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार, सेक्रेटरी श्रीमती रूपाली जाधव मॅडम यांनी शाळेचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनी, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

पाचोरा येथील माध्यमिक कन्या विद्यालयातून गुणवत्ता क्रमांकानुसार प्रथम पाच आलेल्या विद्यार्थिनी खालील प्रमाणे …
1)कु. रोशनी अंगद पाटील, ( गुण-88:80,%)
2) कु. प्रेरणा सुनील वाबळे, ( गुण 84:40,%)
3) कु. हुमेरा जहुर खाटीक,  (गुण 84:00,%)
4) कु. धनश्री बन्सीलाल पवार, (गुण 82:80,%)
5) कु. धनश्री संजय वाडेकर, ( गुण 82:20,%) व  कु. तनुजा कैलास दराडे, ( गुण 82:20 %)

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!