आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचे निवेदन..
पाचोरा-
आज दिनांक १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी एकलव्य संघटनेचे वतीने आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या विवीध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना देण्यात आले आहे.निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,मागील पाच ते सहा महिन्यापूर्वी एकलव्य संघटनेच्या वतीने आपल्या तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आलेला होता त्यामधील काही प्रमुख मागण्या भडगाव पाचोरा तालुक्यातील दफनभूमी ही आदिवासी भिल्ल भूमी. म्हणून नावे लावून वाल कंपाऊंड करून देण्यात यावे. भडगाव पाचोरा तालुक्यातील आदिवासी भिल्ल बांधवांना घरपोच जातीचे दाखले देण्यात यावे जेणेकरून शबरी घरकुल व शासनाच्या विविध योजना पासून आदिवासी भिल्ल समाज बांधव वंचित राहणार नाहीत. अशा प्रमुख मागण्या चे निवेदन आपल्या कार्यालयास देण्यात आले होते परंतु आजपर्यंत कोणतेही कारवाई अथवा प्रोसिजर झालेले नाही म्हणून आम्ही वरील मागण्या पूर्ण होईपर्यंत आपल्या कार्यालया समोर बेमुदत्त अमरण उपोषण सुरू करणार आहोत तसेच राज्य शासन धनगर समाजाला जे खोटे आश्वासन देऊन आदिवासी समाजा मध्ये समाविष्ट करण्याचे, जे प्रयत्न करीत आहे ते कोणत्याही प्रकारे करण्यात येऊ नये अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात रस्तावर उतरून उग्र, स्वरूपाचे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात येईल याची कृपया शासनाने दखल घ्यावी तरी महाशय आपण वरील विषयास, त्वरित लक्ष देऊन मार्ग लावण्यास प्रयत्न करावेत. ही आपणास नम्र विनंती,या आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी जिल्हा अध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख विजय गायकवाड, जिल्हा सचिव दादाभाऊ बहिरम, पाचोरा तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे,प्रकाश निकम,विशाल निकम, रविंद्र माळी, कैलास वाघ,श्रावण सोनवणे, किरण मोरे, समाधान ठाकरे,राजु मोरे,बापु सोनवणे , महेंद्र गायकवाड, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.