राज्य

दंगली बाबत चुकीची माहिती व्हॉट्स अप ग्रुपमध्ये प्रसारित केल्याने पत्रकारावर गुन्हा दाखल

नंदुरबार-

जनतेत पोलिस दलाविषयी अप्रतीची भावना निर्माण केली व दोन समाजामध्ये तेढ व भीतीचे वातावरण निर्माण होईल, असा मजकुर व्हॉटसॲप ग्रुपवर प्रसारीत केल्‍याप्रकरणी नंदुरबार येथील एका पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार येथे तीन दिवसापूर्वी दोन गटात मोठी दंगल झाली होती. त्यात दंगेखोरांनी पोलिसांना लक्ष केले. गृह रक्षक दलातील जवान आणि पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी यांच्यासह 23 जण जखमी झाले तर पोलिसांच्या वाहनांसह 26 वाहनांचे नुकसान झाले. जाळपोळीमुळे अनेक घरांचे व दुकानांचे नुकसान झाले. दरम्यान, या संदर्भात आक्षेपार्ह माहिती प्रसारित होत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून त्यांनी कारवाई सुरू केली. व्हाॅट्स ॲपवर चुकीची माहिती प्रसारित करणे एका पत्रकाराला महाग पडले.

याविषयी पोलीस मुख्यालयातून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, फहीम पत्रकार (मित्र परिवार) व्हॉटसअप ग्रुप मध्ये ९६७३३३६३१३ या मोबाईल क्रमांक धारकाने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना दंगलीचा एक व्हिडीओ प्रसारित केला. त्या खाली “नंदुरबार दंगल पुलिस दंगा करने वालों को पुरा पूरा साथ देते हुऐ देखी जा सकती है” असा मजकुर व इंग्रजीत HOLY MAKER लिहिले होते. ८९५६२२३३८६ या क्रमांक वरूनही त्याच दंगलीचा व्हिडीओ त्या खाली police bhi mili hui hai असा मजकुर टाईप करुन प्रसारीत केला. जनमानसात पोलीस दलाविषयी अप्रीतीची भावना निर्माण केली. दोन समाजामध्ये तेढ व भितीचे वातावरण निर्माण होईल, अशा पध्दतीने चिथावणीखोर पोस्ट व्हॉटस् अप ग्रुपवर प्रसारीत केली. तसेच फहीम पत्रकार (मित्र परिवार) ग्रुप ऍडमीन याने सदर व्हिडीओ क्लीप डिलीट केले नाही किंवा व्हिडीओ क्लीप टाकणारे मोबाईल क्रमांक धारक यांना ग्रुपमधुन रिमुव्ह केलेले नाही म्हणून गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!