“चिन्ह असो वा नसो” विधानसभा निवडणुक लढणारच-डॉ निळकंठ पाटील; नांद्रा येथील शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..
पाचोरा-
दिनांक २४/०९/२०२४ मंगळवार रोजी पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील श्रीराम आश्रमात शेतकऱ्यांसाठी”जगाचा पोशिंदा बळीराजा” मेळाव्याचे आयोजन डॉ.निळकंठ पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
शेतकरी मेळाव्याचा अध्यक्षस्थानी आदर्श शेतकरी नामदेव खंडू सुर्यवंशी हे होते.या शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तम दादा थोरात जेष्ठ संघ कार्यकर्ते सहकार महर्षी शेंदुर्णी यांनी शेतकरी स्वावलंबी तर देश स्वावलंबी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहूने म्हणून डॉ. विजय पाटील (स्त्री रोग तज्ञ), पंढरीनाथ पाटील (कुरंगी) रामकृष्ण पाटील (पहाण),हरीश पाटील (माहेजी), तुकाराम मिस्तरी,सुशिल सुर्यवंशी,अनुलोन भागजनसेवक सचिन खैरे, किशोर शिनकर, विकास लोहार, जगदीश पाटील (वाडी शेवाळे), प्रविण देशमुख,भावडू पाटील, भगवान तावडे,भिका पाटील, भिमराव बाविस्कर, प्रविण तावडे, राजेंद्र बाविस्कर यांचा कुरंगी – बांबरुड जि.प.गटाचे असंख्य शेतकरी उपस्थित होते.प्रास्ताविक किशोर शिनकर तर सुत्रसंचलन सचिन खैरे यांनी तर आभार विकास लोहार यांनी मानले.यावेळी सर्व शेतकऱ्यांना बॅग व बळीराजा ची प्रतिमा भेट देण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक उत्तमदादा थोरात जेष्ठ संघ कार्यकर्ते यांनी आपल्या मनोगतात पारतंत्र्यात शेतकरी स्वावलंबी होता.आतातर परावलंबी झाला आहे लाचार झाला आहे.कोणतेही संकटं आली की सरकारी मदतीवर अवलंबून आहे जसे बोंळ अडी, लाल्या रोगासारख्या समस्या आपण दिलेल्या करातुन सरकार चालते पारतंत्र्यात एक हजार वर्षे स्वाभिमानाने जगलो स्वातंत्र्या नंतर तंत्रज्ञान आले जगाच्या इतिहासात भारतीय शेतकऱ्यांनी क्रांतिकारक शेती केली.शेतकरी सुखी तर जग सुखी या बाबतीत मार्मिक मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे आयोजक डॉ. निळकंठ पाटील मागदर्शन करतेवेळी म्हणाले मी हॉस्पिटल डॉक्टरकी करुन, स्वतः शेती करतो त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती करतांना येणाऱ्या समस्यांची मला माहीती आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या ह्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहून शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करणे,मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने मकासाठी स्टारर्टप कंपन्या, तसेच इथोनाल प्राजेक्ट साठी प्रयत्न करते.शेतरस्ते व शिव रस्ते डांबरीकरण करणे,या भागातील ब सत्ता प्रकारावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला असल्याने यो प्रश्न मार्गी लागलेला आहे.होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मला पक्षाचं चिन्हं मिळाले किंवा नाही मिळाले तरी मी निवडणूक लढवणार आहे.मला सर्व शेतकरी वर्गाची मदत, आशिर्वाद हवा आहे.मी शेतकरी आमदार असेल.सध्या शेतकरी असल्याची स्पर्धा सुरू आहे.परंतु खरा शेतकरी पुत्र शेतकरी डॉक्टर असल्याने सर्व शेतकरी वर्गाने मला या वेळेस भरभरून मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.