ताई,गिरणा वाचली तरच आम्ही जगणार!ग्रामस्थांनी मांडली व्यथा
वाळू चोरीमुळे नदी काठ उद्ध्वस्त झाल्याचे वास्तव आले समोर..
भडगाव-
वाळू चोरीमुळे गिरणाकाठ उद्ध्वस्त होत असून जर नदी वाचली तरच आम्ही जगू !” अशी आर्त हाक देत तालुक्यातील ग्रामस्थांनी शिवसेना-उबाठा पक्षाच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांना साकडे घातले.
शेतकरी शिवसंवाद यात्रा सोमवारी वडजी, रोकडा फार्म, वडगाव नालबंदी येथे तर दुपारच्या सत्रात पांढरद, पिचर्डे, बात्सर व शिवणी येथे काढण्यात आली. वडजी येथे पप्पूदादा, राजेंद्र मोरे, फकिरा पाटील, रवींद्र पाटील, पिंटू परदेशी, पिंटू देवरे आदींनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासोबत वार्तालाप केला. येथील ग्रामस्थांनी गिरणा बचाव ही मोहिम राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. वाळू चोरीवर आळा घालून गिरणेचे संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली. तर, शिव रस्ते नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असल्याची व्यथा देखील त्यांनी कथन केली. यावर वैशालीताई सुर्यवंशी यांनी ‘गिरणा बचाव मोहिम’ याला आम्ही प्राधान्याने महत्व देणार असून या लोकमातेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
रोकडा फार्म येथील ग्रामस्थांनी गेल्या दहा वर्षांपासून आपल्याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याचा आरोप केला. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असून रस्त्यांची देखील अतिशय दुर्दशा झालेली आहे. तसेच गावात व्यायामशाळा, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र आदींची आवश्यकता असल्याची मागणी देखील त्यांनी केली. नालबंदी येथील ग्रामस्थांनी देखील गावाकडे वडगावकडून येणाऱ्या मुख्य रस्त्याची भयंकर दुर्दशा झाली असल्याचा आरोप केला. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्यांची भयंकर स्थिती झाली असतांना देखील याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवणी येथील ग्रामस्थांनी शिवणी ते पिचर्डे रस्त्याच्या समस्येबाबत विवेचन केले. तसेच शिवारातील रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असल्याची समस्या देखील ग्रामस्थांनी कथन केली. येथे शंभूतात्या पाटील या समस्या मांडून यांचे निराकरण करण्याची मागणी केली.
याप्रसंगी शिवाजी पाटील, रवींद्र भील, भगवान पाटील, धोंडू पाटील, भागवत पाटील आदींसह इतरांनी शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला. वैशालीताईंनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. पांढरद येथे रवी आबा, मच्छींद्र आबा, लक्ष्मण पाटील आदींसह इतरांनी वैशालीताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन भैय्यासाहेब निंबा पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला. तर येथील ग्रामस्थांनी गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करतांनाच रस्त्यांची दुर्दशा झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पिचर्डे येथील शिवाजी पाटील, शंकर महाजन, प्रकाश धोबी, संगीता वाघ, विठ्ठल सोनवणे, आनंदा पाटील, धनराज पाटील, प्रकाश पाटील, दगडू महाजन, मधुकर सोनार व जगदीश पाटील यांनी समस्यांचे कथन केले. तर बात्सर येथील भैय्यासाहेब पाटील यांनी शिवारातील रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबणा होत असल्याकडे लक्ष वेधून घेतले.
आजच्या यात्रेत गणेश परदेशी, मनोहर चौधरी, दीपक पाटील, रतन परदेशी, मच्छींद्र पाटील, योजना पाटील, गोरखदादा, मच्छींद्र आबा, पप्पूदादा, राजेंद्र मोरे, रवींद्र पाटील, चेतन पाटील, चेतन जगताप, दत्तू मांडोळे, विजय साळुंखे, भाऊसाहेब पाटील, मनीषा पाटील, रोहित अहिरे, नवल राजपूत, देवेन धोबी, यश बिरारी, शाम सर, फकिराआप्पा, विक्की पाटील, सोनू शिरसे, सत्यजीत पाटील, उमेश पाटील, सनी आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.