पिंपळगाव हरेश्वर येथे नानासाहेब प्रतापराव पाटील, डॉ.पूनमताई पाटील यांनी घेतली गावकऱ्यांची भेट केली चर्चा;सर्वपक्षीय बैठकीत उत्तम प्रतिसाद..
पाचोरा-
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच घोषित झाली असून याबाबतची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ वार बुधवार रोजी विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील व डॉ. पुनमताई पाटील यांनी नुकतीच पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा या मोठ्या गावी भेट दिली असता. प्रथम त्यांनी पिंपळगाव येथील श्रद्धास्थान असलेले गोविंद महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व विश्वस्तांची चर्चा केली.
यावेळी त्यांनी विश्वस्तांचा सत्कार केला व त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रसंगी सर्वपक्षीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या छोटेखानी बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की जर शेतकऱ्यांची जाण असलेला कार्यकर्ता जर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असेल तर आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे त्यांनी सांगितले.
यावेळी पिंपळगाव हरेश्वर येथील राजेंद्र विश्वनाथ महाजन, प्रकाश चव्हाण, सुनील चव्हाण, गजानन तेली, देविदास पाटील, कैलास क्षीरसागर, प्रशांत पाटील, रमेश महाजन, श्रीराम पाटील, सुभाष पाटील, तसेच गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक गोविंद महाराज संस्थेचे विश्वस्त मंडळ हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भावी वाटचालीसाठी नानासाहेबांना शुभेच्छा दिल्या आहेत.