माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांना त्यांच्यात गावातुन भरत पाटलांचे आव्हान.
जळगाव-
महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे तश्यातच जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांना त्यांच्याच कुवारखेडे गावामधून श्री.भरत देवचंद पाटील यांनी निवडणुकीमध्ये आव्हान दिले आहे
अपक्ष उमेदवार भरत देवचंद पाटील हे सर्वसाधारण शेतकरी वर्गातली व्यक्ती असुन फक्त जनसंपर्क आणि त्यांची समाजाप्रती तळमळ परिसरा प्रति तळमळ गावासाठी काही करायचं ही तळमळ तसेच ग्रामीणमध्ये त्यांच्या दांडगा जन संपर्क आणि नाती गोती आहेत भरत दादा ची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक असली तरी त्यांच्या समाजासाठी काही करण्याची धडपड पाहून पूर्ण मतदार संघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भरत दादा हे व्यवसायाने इस्टेट ब्रोकर असून त्यांनी व्यवसाया मार्फत त्यांच्या जनमानसात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे त्यामुळे तळागाळातील गोरगरीब जनतेच्या अधिकारासाठी मायमावल्यांच्या रक्षणासाठी तसेच बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी भरत दादांनी विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी केली आहे त्यांच्या या संघर्षाला संपूर्ण परिसरातून आणि तालुक्यातून कौतुकाची थाप पडत आहे. तसेच श्री. भरत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या गावाचे असल्याकारणाने महाविकास आघाडीला गावातूनच विरोध होत आहे, अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात चालू आहे तरी येणाऱ्या काळात हा संघर्ष किती रंग लावतो हे पाहणे गरजेचे आहे.