कजगाव येथे महारॅली चे आयोजन,किशोर आप्पा पाटील यांना विजयाचा दिला विश्वास.
भडगाव-
कजगाव (ता.भडगाव) येथे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आमदार तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीतुन कजगावकरांनी किशोर आप्पा पाटील यांना विजयाची हॅटट्रिकचा विश्वास दिला.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ सकाळी कजगाव बस स्थानकापासून रॅलीला सुरवात करण्यात आली. पुढे सावता महाराज चौक, पंचशील नगर, भास्कर नगर, भीम नगर, लाल चौक, स्टेशन रोड, विठ्ठल मंदिर, वाकडे गल्ली, शंकर नगर, पाचपावली नगर, जिन एरिया, जुने गाव परीसरात रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, कृउबाचे उपसभापती पी.ए.पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.
चौकट
कजगावकरांचा विजयाचा संकल्प!
कजगावात आज आमदार किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कजगावकरांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयाचा विश्वास देत तुमच्या विकास कामांमुळे विजयाचा संकल्प केल्याचे सांगतीले. ठीकठीकाणी महीलांनी आमदारांचे औक्षण केले. तर लाडकी बहीणीं योजनेची आठवण करून देत आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.