नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ.पुनमताई पाटील यांचा कजगाव येथे प्रचार दौरा उत्साहात संपन्न;मतदारांनी निवडून आणण्याचा दिला विश्वास
भडगाव-
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज 13 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ.पूनमताई प्रशांत पाटील यांची कजगाव येथे प्रचार रॅली उत्साहात संपन्न झाली या दरम्यान डॉ पूनमताई पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रसंगी ठिकठिकाणी पुनमताई पाटील यांचे औक्षण करण्यात आले.
तसेच स्वराज्य पक्षाचे सप्तकीरणातील पेनाची निप चिन्ह घरोघरी यावेळी पोचवण्यात आले या प्रचारादरम्यान त्यांच्या समवेत कार्यकर्ते प्रा.उत्तमराव पाटील, संजय सोनगिरे, प्रशांत पाटील, देविदास पाटील, संभाजी पाटील, निंबालाल पाटील, संजय पाटील इत्यादींनी सहभाग घेतला या रॅलीत विशेष म्हणजे महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नानासाहेब यांचा व स्वराज्य पक्षाचा प्रचार व प्रसार केला ह्या रॅलीने कजगाव या ठिकाणी जुने गाव, नवे गाव, स्टेशन परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, भडगाव रोड परिसर अशा सर्व ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या या रॅली दरम्यान मतदारांनी नानासाहेबांना निवडून आणण्याचा विश्वास याप्रसंगी दिला अशाप्रकारे ही रॅली उत्साहात संपन्न झाली.