पाचोरा शहरात नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ विराट रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष;वातावरण फिरलय आणि पेनाच्या निपने घेरलय!
पाचोरा-
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांनी व अपक्षांनी आपली शक्ती पणाला लावलेली आहे. यातच भडगाव येथील रहिवाशी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून आज दिनांक १५ नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी विराट अशी रॅली सकाळपासून शहरातील एम. एम. कॉलेज महाराणा प्रताप चौकापासून रॅलीला सुरुवात झाली.
नंतर छत्रपती संभाजी महाराज चौकात रॅली आली. त्या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला नानासाहेब प्रताप हरी पाटील डॉ. पूनमताई पाटील यांनी माल्याअर्पण केले. नंतर भुयारी मार्गातून रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. त्या ठिकाणी डॉ.पूनमताई पाटील यांनी माल्याअर्पण केले. तदनंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला माल्याअर्पण करण्यात आले. तदनंतर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ. पूनमताई पाटील यांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातून ठिकाणाहून रॅली नेण्यात आली. यावेळी शहरात अनेक भागातून शहरातील रहिवासी मतदार उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत होती आणि त्यांचा आश्वासक चेहरा सांगत होता की आम्हाला परिवर्तन घडवायचे आहे.
यावेळी ठिकठिकाणी नानासाहेब प्रताप हरी पाटील, डॉ.पुनम प्रशांत पाटील यांचे अनेक ठिकाणी औक्षण करत होते. अनेक ठिकाणी मतदारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत सांगितले की यावेळी परिवर्तनाची लाट असून या लाटेत एक आश्वासक चेहरा मतदार संघासाठी द्यायचा आहे. आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व नानासाहेब प्रताप हरी पाटीलच या मतदारसंघाला योग्य न्याय देऊ शकतात असे बोलले जात होते. सकाळपासून सुरू झालेली रॅली दुपारी जारगाव नाथ मंदिरा जवळ थांबली, नंतर दुपारी रॅली ही रिलायन्स पेट्रोल पंपापासून गाडगेबाबा नगर व परिसर या परिसरात सुरू झाली आणि प्राध्यापक कॉलनी, आदर्श नगर पुंगाव रोड गो.से हायस्कूलचा मागील परिसर या भागात गेली नंतर गो.से. हायस्कूल जवळ रॅली थांबली. विशेष महत्त्वाची गोष्ट या भव्य अशा रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीने संपूर्ण पाचोरा शहराचे लक्ष वेधले होते. ही रॅली पाहून विरोधकांची धडकी भरल्यासारखे दिसून आले. यावेळी नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्यावर प्रेम करणारे आप्तेष्ट मित्रमंडळी तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांची उमेदवारी आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचली असून विजयाची खात्री यातून आली आहे.