नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ सामनेर व नांद्रा येथे कॉर्नर सभा उत्साहात संपन्न;कॉर्नर सभेसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पाचोरा-
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा तालुक्यातील सामनेर व नांद्रा अशा दोन ठिकाणी या कॉर्नर सभा घेण्यात आल्या या सभेप्रसंगी सामनेर येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात आरतीचा मान स्वराज्य पक्षाचे सदस्य दीपक भोसले यांना मिळाला या सभेच्या माध्यमातून नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या कार्याची ओळख व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ध्येय धोरण या वेळी मांडण्यात आले यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हा निमंत्रक चेतन पाटील, स्वराज्य पक्षाचे सदस्य दीपक भोसले, भडगाव तालुका अध्यक्ष प्रतीक पाटील, सदस्य ललित पाटील, गौतम बाविस्कर प्रा निलेश पाटील इत्यादी वक्त्यांनी या सभा गाजवल्या या कॉर्नर सभेसाठी असंख्य मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी स्थानिक कार्यकर्ते सुजित पाटील,संजय पाटील, गणेश पाटील, छोटू पाटील, बबलू पाटील,दादाभाऊ पाटील, गणेश साळुंखे यांनी तर नांद्रा येथे प्रा. नंदू पाटील विशाल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले मतदारांनी या सभेसाठी सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सभेचे यशस्वीतेसाठी दीपक भोसले यांनी अथक परिश्रम घेतले