नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांचा बाळद बुद्रुक,नाचनखेडा, बाळद खुर्द या गावांचा प्रचार दौरा संपन्न;मतदारांनी दिले विजयाचे आश्वासन
भडगाव-
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई प्रशांत पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या सर्वत्र प्रचार रॅली सुरू आहेत त्यात दिनांक 16 नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी बाळद बुद्रुक, नाचणखेडा,आणि बाळद खुर्द या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचाराची सुरुवात बाळद बुद्रुक या गावातून करण्यात आली या गावाचे ग्रामदैवत श्री महेंद्रस्वामी महाराज यांच्या दर्शनाने सुरुवात झाली त्यानंतर शहीद वीर जवान पोपट कमलाकर सूर्यवंशी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचे दर्शन घेतले त्यानंतर बाळद या गावांमध्ये जाऊन घरोघरी मतदारांचे आशीर्वाद घेतले यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून डॉ पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण याप्रसंगी करण्यात आले यावेळी बाळद गावाचे स्थानिक कार्यकर्ते माजी उपसरपंच सचिन भैय्यासाहेब सोमवंशी, अंबादास सोमवंशी, संतोष सोमवंशी, डॉ रवींद्र पाटील,संग्राम पाटील, स्वराज्य पक्षाचे निमंत्रक चेतन पाटील, आबा बाविस्कर, संदीप सोमवंशी, भोजराज सोमवंशी इत्यादी मतदारांनी या रॅलीत सहभाग घेऊन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सप्तकीरणातील पेनाची नीप हे चिन्ह यावेळी घरोघरी पोहोचवले तसेच या गावातून उत्तम असा प्रतिसाद लाभल्याने रॅली उत्साहात संपन्न झाली त्यानंतर नाचणखेडा या गावी या रॅलीचे आगमन झाल्यानंतर तिथेही घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा प्रचार यावेळी करण्यात आला या रॅलीमध्ये स्थानिक कार्यकर्ते संतोष सोनवणे मिलिंद सोनवणे चंद्रसिंग राजपूत आबा पाटील साहेबराव सोनवणे या सर्वांनी सहभाग घेऊन या पक्षाचा प्रचार व प्रसार केला तिथून पुढे बाळद खुर्द या गावांमध्ये ही रॅली नेण्यात आली इथेही घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करण्यात आला व सर्व ठिकाणी उत्तम असा प्रतिसाद लाभल्याने नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना विजयी करण्याचे मतदारांनी आश्वासन दिले.