कार्यकर्त्यांचा उत्साह आणि हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी भवानी मातेला साकडे
नांद्रा (ता.पाचोरा)
पाचोरा भडगाव मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या तिसऱ्यांदा लोकांनी भरभरून प्रेम दिले व आप्पासाहेब किशोर आप्पा पाटील यांनी हॅट्रीक केली.या विजयाने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.आप्पासाहेबांची मित्रमंडळात वर्णी लागावी यासाठी जि.प.सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नांद्रा येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कुरंगी-बांबरुड जी.प.गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरती करून देवीला साकडे घातले.
यावेळी जि.प.सदस्य पदमबापु पाटील, नांद्रा मा.सरपंच विनोद तावडे, हडसन सरपंच राजेंद्र पाटील,डोकलखेडा सरपंच योगेश पाटील, लासगाव सरपंच समाधान पाटील, कुरंगी चे सुनील पाटील, दिनकर पाटील,उमेश चौधरी,एस.टी.सेनेचे जिल्हा प्रमुख नरेश पाटील, आसनखेडा येथील कैलास पाटील, हडसन चे किरण पाटील, यांच्या सह जि.प.गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.