भातखंडे विद्यालयाचे बी एन पाटील यांची आमडदे विद्यालयात पर्यवेक्षकपदी पदोन्नती
भडगाव-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बी एन पाटील यांची भातखंडे विद्यालयात ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर संस्थेच्या सेवाजेष्ठतेनुसार संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या आदेशान्वये दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे येथे पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांच्या या पदोन्नती बद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत विनायकराव पाटील, संस्थेच्या व्हाईट चेअरमन डॉ.पुनमताई प्रशांत पाटील, माध्यमिक सोसायटीचे संचालक जगदीश अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत अशोक पाटील तसेच भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जे. पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमडदेचे प्राचार्य आर. आर. वळखंडे, संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भातखंडे, येथील माजी विद्यार्थी व ग्रामस्थ,आमडदे गावाचे ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.