शिवसेना युवासेना व स्व.बापूजी युवा फाउंडेशन तर्फे हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार सोहळा जल्लोषात;लखीचंद पाटील यांचा पण पूर्णत्वास,आमदारांच्या हस्ते पादत्राणे प्रदान.

भडगाव-
पाचोरा-भडगाव मतदार संघाचे यशस्वी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांची भरघोस मतांनी सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना- युवासेना भडगाव व स्व. बापुजी युवा फाउंडेशन तर्फे भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य अश्या दहा हजार बलाढ्य फुलांचा हार पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, युवासेना जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष व स्व. बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक, भडगाव नगरीचे माजी नगरसेवक लखीचंद पाटील यांच्या हस्ते आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रदान करत, केक कापून, डिजेच्या तालावर, शाही तुतारी धारक मावळ्यांच्या स्वागताने, फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयाची हॅट्रिक मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.लखीचंद पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात त्यांच्या वाढदिवशी आमदार साहेबांची विजयाची हॅट्रिक होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही अशी शप्पथ घेऊन पण केला होता.

तो पण संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या कटिबध्द नियोजनाची जबाबदारी पार पाडत परमेश्वराच्या साक्षीने व मतदारांच्या प्रेमातून पण पूर्णत्वास झाला, तो पण सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार साहेबांनी त्यांच्या हस्ते लखीचंद पाटील यांना पादत्राणे भेट देत यशस्वी पण सोडण्यात आला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपला हितचिंतक कसा असावा हि भावना मनोगतातून व्यक्त करत लखीचंद पाटील यांना कौतुकाची थाप दिली.

या सोहळ्यानंतर स्व. बापुजी युवा फाऊंडेशनची दरवर्षाप्रमाणे याही येणाऱ्या नवीन २०२५ वर्षाची दिनदर्शिका सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्यातील स्व. बापुजी युवा फाऊंडेशनच्या सामजिक उपक्रम बघत सर्वांनी कौतुकाची थाप दिली.या सोहळ्याप्रसंगी शिवसेना-युवासेना पदाधिकारी-कार्यकर्ते, स्व. बापुजी युवा फाउंडेशनचे संचालक सदस्य तसेच भडगाव शहर व तालुक्यातील समस्त समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

