डॉ.अनिल देशमुख यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर.

पाचोरा-
पाचोरा येथील डॉ.अनिल नारायण देशमुख यांना धुळे येथील लोकसेवा बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना दिनांक 23 / 02 /2025 रविवार रोजी धुळे येथील फाईव्ह स्टार ऋतुराज हॉटेल येथे सकाळी 10:30 वाजता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ.अनिल नारायणराव देशमुख सेवा निवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,महाराष्ट्र राजपत्रित पदवीधर पशुवैद्यकीय शासन मान्यता प्राप्त संघटनेचे महाराष्ट्र राज्य चे माजी राज्य कार्यकारिणी अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,कार्यकारी अध्यक्ष ,रोटरी इंटर न्याशनल चे डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी गृप गव्हर्नर प्रतिनिधी तथा असिस्टंट गव्हर्नर ,मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय चे विद्यार्थी परिषद माजी अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी चे माजी विधी सभा सदस्य, ,तरुण शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष जळगाव ,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य, धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग इत्यादी मध्ये पॅनल सदस्य आहे.




