अमळनेरच्या बॅन्ड मालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल..

चोपडा-
अमळनेर येथील रहिवासी,रउफ बॅंडचा मालक,अस्लम अली युसूफ अली सय्यद (वय २९) रा. सराफ बाजार, अमळनेर हा चोपडा तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात बोलवून तेथून तीला पळवून नेत असतांना त्याला हिंदू कार्यकत्यांकडून पकडण्यात आले. त्यानंतर त्यास चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याला तीन आपत्य असल्याची माहिती समोर आली आहे.पीडित अल्पवीयन मुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की, अस्लम अली युसूफ अली सय्यद हा माझ्या मुलीला भुरळ घालून तिला अमळनेर येथे भेटायला बोलवत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जवळीक साधून वारंवार संपर्क साधायचा. यातच काही दिवसांपूर्वी अस्लम अलीने मुलीला विश्वासात घेऊन किनगाव शिवारात शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले. याबाबत मुलीने आम्हाला सांगिल्यावर आम्ही अस्लम अलीला ताकीद देऊन मुली पासून दूर राहण्याचे सांगितले. पण अस्लम अलीने दि.२३ रोजी सकाळी १० वाजता मुलगी संगणक क्लाससाठी चोपडा येथे गेली असता तिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयाजवळ गाठून तिला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतांना त्याला पकडले. त्याला व मुलीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पीडिताच्या आईने फिर्यादित म्हटले आहे.आईच्या फिर्यादीवरून अस्लम अली युसूफ अली सय्यद यांच्या विरोधात चोपडा शहर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे हे करीत आहेत. आरोपी अस्लम अलीला चोपडा न्यायालयात उभे केले असता त्याला दि.२८ मे पोलीस कोठडी सुनावण्यात आला आहे.
पीडित अल्पवीयन मुलीच्या आईने फिर्यादित म्हटले आहे की, अस्लम अली युसूफ अली सय्यद हा माझ्या मुलीला भुरळ घालून तिला अमळनेर येथे भेटायला बोलवत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जवळीक साधून वारंवार संपर्क साधायचा. यातच काही दिवसांपूर्वी अस्लम अलीने मुलीला विश्वासात घेऊन किनगाव शिवारात शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले. याबाबत मुलीने आम्हाला सांगिल्यावर आम्ही अस्लम अलीला ताकीद देऊन मुली पासून दूर राहण्याचे सांगितले. पण अस्लम अलीने दि.२३ रोजी सकाळी १० वाजता मुलगी संगणक क्लाससाठी चोपडा येथे गेली असता तिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयाजवळ गाठून तिला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असतांना त्याला पकडले. त्याला व मुलीला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पीडिताच्या आईने फिर्यादित म्हटले आहे.आईच्या फिर्यादीवरून अस्लम अली युसूफ अली सय्यद यांच्या विरोधात चोपडा शहर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात असून याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे हे करीत आहेत. आरोपी अस्लम अलीला चोपडा न्यायालयात उभे केले असता त्याला दि.२८ मे पोलीस कोठडी सुनावण्यात आला आहे.




