हप्तेखोर पोलीस निरीक्षकाविरोधात आज जळगावात पत्रकारांचे आंदोलन;पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक.

जळगाव-
स्वतःला मिळणारे हप्ते कमी झाले म्हणून पत्रकारांवर गुन्हा दाखल करणाऱ्या पाचोरा पोलीस स्टेशनचे हप्तेखोर पोलीस निरीक्षक अशोक कचरु पवार व त्याचा साथीदार काळे धंद्यांचा आका भोला उर्फ शेखर पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी आज सोमवार रोजी लेखणीच्या साथीदारांचे जळगाव येथे आंदोलन आहे. या आंदोलनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या तर्फे निवेदन देण्यात येणार आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. अनेक घडामोडी पत्रकार निडरपणे मांडत असतात, मात्र सध्या निडर व निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून हा लोकशाहीचा चौथा खांब तोडण्याचा कट अनेक लोकं आखत आहेत. याचाच प्रत्येय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, तसेच संघटनेचे पदाधिकारी असलेले राकेश सुतार, कुंदन बेलदार यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे वरील पदाधिकारी / पत्रकार यांनी पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे विरोधात बातम्यांचे सत्र सुरू केले होते. नंतर या बातम्यांच्यामुळे पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे बंद पडले व पाचोरा पोलिसांचे हप्ते देखील थांबले होते. म्हणून अवैध धंद्यांचा आका असलेला भोला उर्फ शेखर पाटील याने आपला धंदा बंद पडल्याच्या रागातून व पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांनी आपले हप्ते बंद झाल्याच्या रागातून दोघांनी संगनमत करून श्री किशोरजी रायसाकडा व वरील लोकांवर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही लोकशाहीला काळिमा फासणारी असून हप्तेखोर असलेला पोलीस निरीक्षक अशोक कचरु पवार याला तात्काळ निलंबित करावे व त्याची तसेच त्याच्या परिवाराची अवैध मार्गाने / हप्तेखोरी करून कमावलेल्या संपत्तीची चौकशी करावी. व काळ्या धंद्यांचा आका असलेला भोला उर्फ शेखर पाटील याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला देखील पाचोरा तालुक्यातुन हद्दपार करावे व जर संबंधित लोकांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पत्रकार संघातर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे नाशिक विभागीय अध्यक्ष समाधान मैराळे यांनी दिला आहे.