क्राईमजळगाव जिल्हा

महावितरणचा उपअभियंता लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पाचोऱ्यात कारवाई.

पाचोरा-

पाचोरा महावितरणचे उपविभागीय अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय -३८) यांना २९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १२ ऑगस्ट मंगळवार रोजी रंगेहाथ पकडले. सोलर पॅनल बसवण्याच्या कामांना मंजुरी देण्याच्या बदल्यात त्यांनी ही लाच मागितली होती. या कारवाईने महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एका ३२ वर्षीय तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे ११ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून, त्यांच्या कामांना मंजुरी देण्यासाठी  मनोज मोरे यांनी एकूण ७९,००० रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये तक्रारदाराच्या तीन नवीन प्रकरणांसाठी प्रत्येकी ३,००० रुपये असे एकूण ९,००० रुपये आणि यापूर्वी मंजूर केलेल्या २८ प्रकरणांसाठी प्रत्येकी २,५०० रुपये असे एकूण ७०,००० रुपयांचा समावेश होता.

एसीबीने सापळा रचून मनोज मोरे यांना त्यांच्या कार्यालयातून अटक केली. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडून २९ हजार रुपये स्वीकारले, ज्यात नवीन कामांचे ९ हजार रुपये आणि मागील कामांच्या लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून २०,००० रुपयांचा समावेश होता. मोरे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आणि चालक सुरेश पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!