जळगाव जिल्हा बास्केटबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना..

पाचोरा-
दिनांक १० ते १४ सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने सोलापूर येथे तेरा वर्षातील मुले व मुली आंतर जिल्हा राज्य अजिंक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ सहभागी करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट रोजी एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे बास्केटबॉल मैदानावर जिल्हा संघासाठी निवड चाचणी घेण्यात आली. सदर निवड चाचणी मध्ये ४० मुले व २६ मुलींनी सहभाग घेतला होता. सदर निवड चाचणीचे उद्घाटन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.लौकिक मुंदडा, जावेद शेख,वसीम शेख, जितेंद्र शिंदे, निलेश पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. निवडण्यात आलेल्या संभाव्य सतरा मुलांचे सराव शिबिर दि.५ ते ८ सप्टेंबर पर्यंत एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे प्रशिक्षक जावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. तसेच निवडण्यात आलेल्या संभाव्य सतरा मुलींच्या संघाचे सराव शिबिर लौकिक मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथे घेण्यात आले. निवडण्यात आलेल्या संभाव्य संघामधून बारा मुले व बारा मुलींची घोषणा ८ सप्टेंबरला करून दिनांक ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना झाला.
१३ वर्षातील मुलांचा संघ
१)उमेर शेख
२)भाग्येश पाटील
३)विराज पाटील
४)सत्यम पाटील
५)राज पाटील
६)यर्जुवेंद्र शिवडे
७)रोहित पाटील
८)संकेत मांडोळे
९)लोकेश भोळे
१०)हर्ष जैस्वाल
११)मयुरेश चौधरी
१२)गणेश पाटीलश
१३ वर्षातील मुलींचा संघ
१)सानिया ललवाणी
२)लक्ष्मी हटकर
३)कल्याणी चौधरी
४)मोक्षदा सोनवणे
५)खुशी आशिर्वाद
६)तेजस्वि बनसोडे
७)राजेश्री चव्हाण
८)राजलक्ष्मी भोईटे
९)आरध्या पाटील
१०)शरण्या शिंदे
११)तिथी जैन
१२)रिद्धी काळे.
निवडण्यात आलेल्या जिल्हा संघाला एस.एस.एम.एम. महाविद्यालय पाचोरा व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, सहसचिव माननीय प्राध्यापक वी.टी.जोशी, प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक गिरीश पाटील, विकास सूर्यवंशी, दिपक पाटील तसेच जयंत देशमुख (सहसचिव महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना) यांनी शुभेच्छा दिल्यात.





