पाचोऱ्यात सहायक महसूल अधिकारी दहा हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले,महसूल विभागात खळबळ..

पाचोरा-
पोटखराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहीतीखाली लावणेकामी सहायक महसूल अधिकारी यांना १० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले,महसूल विभागात खळबळ.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची पत्नी यांचे नावे मौजे कोकडी ता.पाचोरा शिवारात पोट खराब क्षेत्र असुन ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले असुन त्यावर पिक लागवड करत आहे. परंतु सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७/१२ मध्ये पोट खराब म्हणुन दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि शेती विषयक कर्ज मिळत नाही. म्हणून सदरचे पोटखराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहीतीखाली लावणेकामी तक्रारदार यांची पत्नी यांचे नावे दि. ०४.०९. २०२५ रोजी पाचोरा उप विभागीय कार्यालयात अर्ज करुन, अर्जात नमुद केलेले काम करुन देण्यासाठी सदर कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७) यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी सदरचे काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एकुण १५,०००/- रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांची इच्छा नसतांना त्यांनी लोखंडे यांना ५,०००/- रुपये रोख दिले होते व बाकी १०,०००/- रुपये दिल्यावर तुमचे काम करुन देईल, असे लोखंडे यांनी सांगीतले होते. परंतु तक्रारदार यांना त्यांचे मागणीप्रमाणे बाकी असलेले १०,०००/- रुपये लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ०९/०९/२०२५ रोजी ला.प्र.वि.जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सदर तक्रारीची पडताळणी केली असता लोखंडे यांनी यापुर्वी ५०००/-रू. स्विकारल्याचे कबुल करून बाकी असलेले १०,०००/- लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे आज दिनांक १०/०९/२०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे श्री. गणेश लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून मागणी केलेल्या १५,०००/- रू. लाचेच्या रकमेपैकी दुसरा हफता १०,०००/- रुपये लाचेची रक्कम आलोसे श्री. गणेश लोखंडे यांनी स्वतः करीता तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे.
सापळा कारवाई, पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, सापळा व तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक,पो.शि.भुषण पाटील, पो.शि.राकेश दुसाने,पो.शि.अमोल सुर्यवंशी, मार्गदर्शन भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक,सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधावा.






