हरवलेला 3वर्षांचा चिमुकला पोलिसांच्या तत्परतेने सुखरूप;केले त्यास आजीच्या स्वाधीन

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रोहन सुनील तवर (वय ३ वर्षे) हा चिमुकला पाचोरा तहसील कार्यालयाच्या आवारात हरवलेला आढळून आला. पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्पर कार्यवाहीमुळे हा चिमुकला अखेर सुरक्षितपणे आपल्या कुटुंबीयांकडे परतला आहे.प्राप्त माहितीनुसार, पाचोरा तहसील कार्यालय परिसरात एकटाच रडत फिरणारा तिन वर्षाच्या मुलगा नागरिकांच्या नजरेस आला. नागरिकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन पाचोरा पोलिस ठाण्यात आणले.यानंतर पोलिसांनी मुलाची ओळख पटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. चौकशीत त्याचे नाव रोहन सुनील तवर असून तो कुऱ्हाड तांडा येथील असल्याचे समोर आले. मुलाचे आई-वडील सापडत नसल्याने पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन अखेर त्याची आजी कमलबाई प्रकाश तवर यांचा शोध लावला. त्यांच्याकडे मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण तपासात पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन याबद्दल नागरिकांकडून पाचोरा पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.





