जळगाव जिल्हा

सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते जंतुनाशक, डास नियंत्रक फवारणीचा वरखेडी आणि भोकरी येथे श्री गणेशा.

पाचोरा –

पाचोरा भडगाव तालुक्यातील डेंग्यू लागण नियंत्रणात आणण्यासाठी तथा नागरिकांचे अनमोल प्राणांचे रक्षण करण्यासाठी “आरोग्य तुमचे काळजी आमची” या सामाजिक बांधिलकीतून निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा च्या माध्यमाने माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हा प्रमुख उध्दवभाऊ मराठे, शेतकरी नेते रमेश जी बाफना, व सर्व शिवसेना पदाधिकारी बांधवांच्या समवेत दिनांक 07/11/2023 मंगलवार रोजी सकाळी 09:00 ते 10:00 च्या दरम्यान जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचा श्री गणेशा वरखेडी आणि भोकरी येथे करण्यात आला.
यावेळी ताईसो म्हणाल्या की, शहर व तालुका मध्ये सध्या डेंग्यू, ताप मलेरिया सर्दी व खोकला अशा विविध आजारांच्या साथीने थैमान घातले आहे ही आजाराची साथ वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना राबविणे अतिशय आवश्यक आहे या साथीने अनेक कुटुंब व अनेक लोक त्रस्त आहे याची दखल घेऊन आम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रतिबंधात्मक सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात व ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकीतून जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचे नियोजन केले असून हा उपक्रम शहरात व ग्रामीण भागात दिनांक 23/10/2023 पासून सुरू करण्यात आले आहे आम्ही सामाजिक बांधिलकीतून कोरोनाचा काळ असो की शेतकरी असोत नागरिक असोत समुदायाच्या प्रबोधन आरोग्य व विकासाच्या दिशेने आतापर्यंत लक्षणीय योगदान दिलेले आहेत आज सुद्धा आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाचा जाणिवेतून आणि भूमिकेतून या साथीच्या रोगाची प्राधान्याने दखल घेऊन व पुढाकार घेत डास नियंत्रक फवारणी अभियान राबवित आहोत आपणास विनम्रतापूर्वक आवाहन करण्यात येते की, आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये, कॉलनी मध्ये परिणामकारक फवारणीसाठी सहकार्य करावे त्याचबरोबर आपण सर्वांनी दिवाळी या शाळा सुटीच्या काळात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लोकांच्या आरोग्याला आम्ही प्रथम प्रधान्य देतो आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. याप्रसंगी वरखेडी येथे ग्रामपंचायत सरपंच सौ. सविता चंद्रकांत पाटील सरपंच, चंद्रकांत प्रकाश पाटील, माझी ग्रामपंचायत सरपंच धनराज विसपुते, ग्रामपंचायत सदस्य विजय, दशरथ भोई, निर्भय मोरे, ग्राम विकास अधिकारी नन्नवरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी धनराज भोई, अंकुश पाटील, शंकर बोरसे, चौधरी निलेश भोई, बटू चौधरी, शंकर तिवारी, रविशंकर पांडे, दिलीप पाटील व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. तसेच भोखरी येथे मौलाना अरमान अब्दुल कादर सरपंच, जलील रफिक काकर उपसरपंच, आणि सदस्य मध्ये असलम रुस्तम काकर, अफसर शकूर काकर, नबी अब्दुल शेख, फरजानाबी सलीम काकर, शाहीनबी मुक्तार शेख, रजियाबी अब्दुल ककर, हसननूरबी महमूद काकर, जावेद नादर काकर, शहनाजबी अल्ताफ शेख, सुफियाबी स्माईल काकर, फिरोजाबी अलीम काकर, डॉक्टर अश्फाक जाकीर का कर जाकीर हलवाई हकीम टेलर रज्जाक हाजी अब्दुल बिके जुम्मा नाना स्माईल जुम्मा गुलाब मुल्लाजी अरबाज डी एम एल टी मोसिन ऑफिस सुलतान अल्ताफ व्यापारी समीर हुजेफा फैयाज अख्तर जाफर अरुण काकर जब्बार बीके रेहान काकर इम्रान काकर चंदू पाटील विसपुते अण्णा दिलीप बाई अल्ताफ हलवाई पोलीस पाटील भोकरे सलीम भाई भुऱ्या भगवान धोंडू शंभूराज संजय सुपडू चौधरी शंकर दौलत बापू चौधरी संभा चौधरी सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!