जळगाव जिल्हा

भोकरी येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात बाबत प्रांताधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी चा वतीने निवेदन.

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील वरखेडी भोकरी येथील रेशनदुकानीचा परवाना रद्द करण्यात यावे याकरिता वंचित बहुजन आघाडी चा वतीने पाचोरा प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले कि, मौजे वरखेडी व भोकरी या गावांमधील स्वस्त धान्य दुकानात भोंगळ कारभार चालू असून गोरगरिबांना महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या तर्फे प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देत असून मौजे वरखेडी व भोकरी या गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानदार हे ग्राहकांची लूटमार करत असून ज्या लाभार्थी कार्डधारकांना 35 किलो धान्य मिळते त्या कार्डधारकांना 25 किलो धान्य देण्यात येते व ज्या कार्डधारकांना 25 किलो धान्य मिळते त्यांना 15 ते 20 किलो धान्य वाटप करत असून ग्राहकांची लूटमार करत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि उरलेले धान्य गावातील धन दांडग्या व्यक्तींना गुरांच्या दाणासाठी गोण्या च्या गोण्या विकत दिल्या जात असल्याबाबत तक्रारी वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
तरी संदर्भ क्रमांक १) मधील व्हिडिओ क्लिप बघितल्यावर हे स्पष्ट होते की सदर दुकानदार हे ग्राहकांना 35 किलो धान्य मधून 25 किलो धान्य वाटप करत असतो आणि संदर्भ क्रमांक २) मधील ई-पोच मशीन मधील पावती यावर 35 किलो धन्य लिहून येते व प्रत्यक्षात मात्र 25 किलो धान्य ग्राहकांना वाटप होत आहे. व नंतर सदरील इपॉस मशीन मधील पावतीही सदर दुकानदार ग्राहकांकडून जमा करून स्वतःकडे ठेवतात.तसेच संदर्भ क्रमांक ३)मध्ये वरखेडी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या फलकावर दुकान क्रमांक व दुकान चालक यांचे नाव हि दिसत नाही तसेच दुकानात ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार नोंदवही देखील उपलब्ध नाही. आणि भोखरी गावातील स्वस्त धान्य दुकानावर साधे स्वस्त धान्य दुकानाचे नाव फलक ही नाही व भाव फलक तक्रार नोंदवही असे काहीच नाही आणि वारंवार तोंडी तक्रारी करून देखील ही कोणी कानावर घेत नाही आणि सदर दुकानदार हे अरेरावेची भाषा करत असून तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या असं म्हणत ग्राहकांना तिथून हाकलून लावतात अशा प्रकारे वरखेडी व भोकरी येथील काही ग्राहकांनी वंचित बहुजन आघाडी शाखा पाचोरा यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी तक्रार दिलेली आहे.
या करिता वरखेडी व भोकरी गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे तात्काळ स्वस्त धान्य दुकानाचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात यावा. आणि सदर दुकानदारास परवाना देण्यात आल्यापासून आज रोजी पर्यंत ग्राहकांची केलेली फसवणूक व लुटमार याची सखोल चौकशी करून कायदेशीर गुन्हा नोंद करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी . या करिता वंचित बहुजन आघाडी तर्फे तक्रार निवेदन देण्यात येत आहे . असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलनाचा पावित्रा करण्यात येईल.व होण्याऱ्या घटनेस प्रशासन जबाबदार राहिल
याची नोंद घ्यावी.या आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले
निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष विशाल बागुल, सचिव दिपक परदेशी,प्रसिध्दी प्रमुख आकाश पवार, एजाज पिंजारी,यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!