पाचोरा शहरातील वयोवृध्द आजी दिवाळीच्या आंनदाचा शिधा पासुन वंचित..
पाचोरा-
महाराष्ट्र शासनाने गोर गरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशनकार्ड धारकांना आंनदाचा शिधा १०० रुपयात ६ वस्तु १किलो साखर,१किलो तेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे, अर्धा किलो हरभरा डाळ,वाटण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
कुष्णापुरी भागातील रहिवासी कमलबाई सुर्यवंशी यांचे एकच नाव रेशनकार्ड मध्ये असुन त्या रेशन दुकानदार कडे आंनदाचा शिधा घेण्यासाठी चार ते पाच वेळा धान्य दुकानात गेले असता ई-पॉस मशिन वरती अंगठा आला नाही म्हणून त्यांना आंनदाचा शिधा मिळाला नाही व त्या वयोवृध्द आजी स दुकानदाराने सांगितले तु कुठेही जा कोणालाही सांग तुला आंनदाचा शिधा मिळणारचं नाही अशी माहिती वयोवृध्द आजी ने पिबीएन महाराष्ट्र न्युजला दिली.या वरुन असे लक्षात येते कि दुकानदार जसे कि आपल्या घरुन नागरीकांना शिधा वाटतात असे वाटते.
या अश्या दुकानदारांच्या डोक्यावर कोणाचा आशिर्वाद असल्याशिवाय ते असे नागरीकांना बोलणार नाही, अथवा असे वागणार नाही.
मग पाचोरा तालुक्यातील बऱ्याच गावातील गोरगरीब रेशनकार्ड धारक ऊसतोडणी करीता बाहेरगावी गेले आहेत मग त्यांच्या आंनदाचा शिध्याचे काय?
अश्या मुजोर दुकानदार व त्यांना पाठिंशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई वरीष्ठ पातळीवरुन करावी.
जेणे करुन वयोवृध्द आजी सारखं कोणीही वंचित राहणार नाही.