वानेगाव येथील 31 वर्षीय इसमावर 354 सह पोक्सो दाखल
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील वानेगाव येथील अल्पवयीन मुलगी ही तिच्या घरासमोर खेळत असताना आरोपी नामे-अमोल जयेंद्र संसारे वय 31 वर्ष रा.वानेगाव ता.पाचोरा याने तिला आईस्क्रीम देण्याचा बहाण्याने घरात बोलवून तिचे हातावर हात फिरवत तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला असता मुलगी जोरजोरात ओरडायला लागली असता कोणाला काही सांगू नको नाहीतर तुझे तुकडे करून फेकून देईल अशी दमदाटी करून सोडून दिले अशी पीडित मुलीच्या वडिलांचे फिर्यादीवरून नमूद आरोपीविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोस्टला गु. र. न.354/2023 कलम 354(ब),506 सह पोक्सो कायदा कलम 8,12 प्रमाणे दि 15/12/2023 रोजी रात्री 00.04 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनी एम ए वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत असून नमूद आरोपिताचा शोध घेवून त्याला अटक करून माननीय विशेष न्यायालय, जळगाव येथे हजर केले असता त्यास 14 दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दिली आहे.