क्राईमक्रीडा

पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून;चार संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चाळीसगाव-

मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव येथे क्रिकेट स्पर्धेच्या वादातून काही तरुणांनी धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

चाळीसगाव येथील राहणारा शुभम अर्जून आंगणे (वय 28) हा तरुण मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता.

चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. या सामन्यात मयत शुभम आंगणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले.

हि घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली असुन. यात रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरीकांनी तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी तरुणास मयत घोषीत केले. या घटनेबाबत नातेवाईक कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्याची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!