श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा. येथे इंग्लिश, सायन्स विषयाअंतर्गत पेपर मार्बलिंग प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर
पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे
इयत्ता सहावी English या विषयातील ‘At The Science Fair’ या पाठातील Paper Marbling या घटकावर आधारित प्रात्यक्षिक प्रत्येक्षपणे अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला .
English, सायन्स आणि चित्रकला या तीनही विषयांची सांगड घालत हा उपक्रम राबवण्यात आला . सायन्स मधील ‘तेल पाण्यावर तरंगते ‘ या गुणधर्माचा वापर करून , रंगाची सांगड घालून English मधील पाठाची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली .
प्रत्यक्ष कृती करून दाखवली . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे यांनी केले या विषयात पेपर मॉडेलिंग गुणधर्म विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्रात्यक्षिक आधारे या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यद्यापक नरेंद्र पाटील पर्यवेक्षिका अंजली गोहिल ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा पाटील इंग्रजी शिक्षिका वैशाली कुमावत, शितल महाजन यांनी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना प्रत्यक्षात त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले यावेळी ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील, कलाशिक्षक सुबोध कांतायन ,प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना विविध रंगसंगतीच्या आधारे ऑइल पेंट कलर चा वापर करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवली कार्यक्रमाचे आभार संदीप मनोरे यांनी मानले यावेळी इयत्ता सहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना या प्रात्यक्षिकेचा आनंद घेता आला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. त्या कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले