जळगाव जिल्हा

दहिगाव (संत) येथील वृद्धेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

पाचोरा-

दहिगाव (संत) येथील वृद्धेचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची उघडकीस आली असून या घटने प्रकरनी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील दहिगाव (संत) येथील मथुराबाई नामदेव कोळी (वय-७४) या वृद्धेचा शेतातील विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना  सकाळी ११:४० वाजेपुर्वी उघडकीस आल्याने या वृद्धेला तत्काळ रुग्णवाहिके मार्फत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मयत वृद्धेचे पती नामदेव कोळी यांनी दाखल केले असता. वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले असून या घटने प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तुषार विसपुते करीत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!