पुणे-
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे, पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ होतांना दिसुन येत आहे.
पुण्यातून एक धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला १५ दिवस डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेला १५ दिवस लॉजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पुण्यातील ३ लॉजमध्ये जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूनम माने (वय २२) आणि आकाश माने (वय २४) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केलीय. तर तिचा नवरा आकाश हा फरार आहे.