प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे पोलीसांनी वाचवले प्राण..
जळगाव-
छत्रपती संभाजीनगर येथील तरुणाकडून रॉंग नंबर डायल झाला आणि तो थेट जळगावातील एका तरुणीला लागला. एकमेकांच्या प्रेमात पडले प्रेम बहरले मात्र प्रेयसीने कानाडोळा करताच प्रियकर थेट जळगावच्या रेल्वे रुळावर, ११२ डायल करून मी आत्महत्या करत आहे मृतदेह घेण्यासाठी या पोलीसांनी दिली तरुणाने माहीती, वाचवले तरुणाचे प्राण.याबाबत सविस्तर वृत्त असे की,
छत्रपती संभाजीनगर येथील २६ वर्षीय उच्च शिक्षित तरुण खाजगी नोकरी करत होता.सन २०१८ मध्ये त्याच्याकडून एक रॉंग नंबर लागला आणि त्यातून जळगाव येथील एका तरुणीसोबत त्याचा संपर्क झाला. हा संपर्क वाढत त्याचे रूपांतर प्रेमात झाले. ६ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर २०२३ च्या अखेरपर्यंत प्रेयसीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. यामुळे हा तरुण निराश झाला होता.त्याने आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला. जळगाव येथील प्रेयसी बोलत नसल्याने त्याने नोकरी देखील सोडली आणि व्यसनाच्या आहारी गेला. नंतर त्याने घर सोडले आणि जळगावला शहरात आठ दिवस प्रेयसीचा शोध घेऊन देखील ती न भेटल्याने त्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेत पिंप्राळा रस्त्यावरील रेल्वे रूळ गाठला पंधरा मिनिटे रेल्वे न आल्याने त्याने डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधून मी आत्महत्या करत आहे. माझी बॉडी घ्यायला या असे कळवले. तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रदीप रणीत, पोलीस नाईक चंद्रकांत सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पाटील यांनी तातडीने तरुणाचा शोध घेतला त्यास ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले असता पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी विचारपूस केली त्यावेळी त्याने संपुर्ण लव्ह स्टोरी कथन केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी त्या तरुणाचे समुपदेशन केले व परीवाराचा स्वाधीन केले.