क्राईमराज्य

बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस बिंग फुटले; गुन्हा दाखल.

अकोला-

अकोल्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक तरुणाने आपल्या बहिणीला बारावीच्या परिक्षेत कॉपी पुरवण्यासाठी तोतया पोलीस होऊन परीक्षा केंद्रावर पोहचला. मात्र त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.उपलब्ध माहितीनुसार, अकोल्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार होती. तेथे एक तरुण परीक्षेदरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून केंद्रावर पोहोचला. यावेळी वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याने सॅल्यूट केला. सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याने तो पकडला गेला.उपलब्ध माहितीनुसार, अकोल्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार होती. तेथे एक तरुण परीक्षेदरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून केंद्रावर पोहोचला. यावेळी वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याने सॅल्यूट केला. सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याने तो पकडला गेला.अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या २४ वर्षीय आरोपीचे नाव अनुपम मदन खंदारे आहे. तो पांगरा बंदीचा रहिवासी आहे. त्याचा बहिणीची परीक्षा पातूरच्या शाहबाबू हायस्कूलमध्ये होती. अनुपम खंदारे पोलिसांचा गणवेश परिधान करून या परीक्षा केंद्रावर पोहोचला. बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर फिरू लागला. त्यावेळी सुरक्षेसाठी पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाहताच अनुपम यांनी त्यांना सॅल्यूट केला, मात्र त्यांची सॅल्युट पाहून पोलीसांना संशय बळावला. तरुणाने घातलेल्या गणवेशावरील नेम प्लेटही चुकीची होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी त्याची चौकशी केली. झडती घेतली असता त्याच्या खिशात इंग्रजी भाषेची प्रत सापडली. यानंतर पोलीसांनी त्याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!