राज्यशैक्षणिक

आज १२ वीचा ऑनलाईन निकाल होणार जाहीर; विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली


मुंबई-

राज्य बोर्डाकडून आज दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. अखेर राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. ‘सीबीएसई’ परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी बारावीच्या निकालाबाबतचे सोमवारी पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार आज मंगळवार २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी.

महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत mahahsscboard.in, mahresult.nic.in व results.gov.in संकेतस्थळावर जा

महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा

HSC निकाल लिंकवर क्लिक करा

रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा

१२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल

पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल

संकेतस्थळावर जा

महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा

HSC निकाल लिंकवर क्लिक करा

रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा

१२ वीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल

पुढील संदर्भासाठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करून ठेवता येईल

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!