Blog

छोटा हत्ती मालवाहतूक व मोटरसायकल च्या अपघातात 4 वर्षीय मुली सह वडीलांच्या जागीच मृत्यू

भडगांव-

भडगांव जवळच छोटा हत्ती मालवाहतूक व दुचाकीच्या अपघातात उप्पलखेड येथील 29 वर्षीय बाप व 4 वर्षीय मुलगीचा अपघातात मुत्यू झाल्याची घटना दिनांक 1 मार्च 2024 शुक्रवार रोजी दुपारी 04:00 वाजेच्या सुमारास भडगांव ते पिंपळगाव रोडवर घडली आहे, या घटने बाबत शिवदास चव्हाण यांचे फिर्यादीवरून चालक भिका माळी राहणार बाभळेनाग तालुका पारोळा यांच्याविरुद्ध भडगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ५६/२०२४ भा.द.वी कलम ३०४(A),२७९,३३७,३३८,४२७,१८४ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेन पालकर, छबुलाल नागरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे, शिवदास यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, छोटा हत्ती गाडी क्रं. एम.एच.४३ ए.डी.३५४२ चालक नामे गणेश माळी याने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन अति भरधाव वेगात वाहन चालवून समोरुन येणारी हिरो कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक एम.एच.२० एफ एम १०५६ हिस धडक मारुन तिचे वरील चालक नामे गजानन भगवान चव्हाण (वय-२९) व त्याची मयत मुलगी रागिणी गजानन चव्हाण (वय – ४) वर्षे दोघे रा. उप्पलखेडा ता. सोयगांव जि. छ.संभाजीनगर याचे तोंडास, डोक्यास, हातापायास गंभीर दुखापती होवुन दोघांच्या मरणास कारणीभूत असल्यामुळे व दोघे वाहनाच्या नुकसाणीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!