Blog

गोल्डन सियारा पब्लिक स्कूल यांच्या वतीने रामदरा डोंगर येथे वृक्षारोपण


लोणी काळभोर (प्रतिनिधी)

तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग यांच्या वतीने पाच लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच कदम वाकवस्ती कवडीपाठ येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कूल मधील स्काऊट गाईडचे ५० विद्यार्थी यांच्या वतीने बेल,वावळा, कडुलिंब, शिरस, करंज, उंबर,वड, अशा ५१ जंगली औषधी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महादेव मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली.
या वेळी गोल्डन सियारा पब्लिक स्कूल शाळेचे अध्यक्ष शैलेश चंद, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका अध्यक्ष नितीन सुदाम काळभोर, गणेश काळभोर तसेच क्रीडा शिक्षक हेमंत डोईफोडे, रोहन चंद, संदीप पिलाने, समाधान गायकवाड व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
वृक्षांमुळे पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते. म्हणून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने एकत्री वृक्ष लाऊन त्याचे संवर्धन केले पाहिजे, ‘एकच लक्ष ५ कोटी वृक्ष’ हा नारा पुणे जिल्हाच्या कानाकोपऱ्यात घुमला पाहिजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन खूप गरजेचे आहे. असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार गणेश काळभोर यांनी तर सुत्रसंचालन हेंमत डोईफोडे यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!