पवन एक्स्प्रेस मध्ये प्रवासा दरम्यान इसमाचा मृत्यू
पाचोरा-
दिनांक 10 मार्च रविवार रोजी मुंबई कडून जळगाव च्या दिशेने जाणाऱ्या गाडी नंबर 11061लोकमान्य टिळकनगर जयनगर पवन एक्सप्रेस च्या मागील विकलांग कोच मध्ये 54 वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत असल्याबाबतची माहिती पाचोरा स्टेशन वरील दूरक्षेत्र पोलिसांना मिळाली पाचोरा जंक्शन वरील हेडकॉन्स्टेबल मधुसूधन भावसार यांचेसह रुग्णवाहीका चालक अमोल पाटील यांनी पवन एक्स्प्रेस पाचोरा स्टेशनवर सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास थांबली असता अस्लम सलीम नामक राहणार दुघालाई बिंदकी, फतेपूर, उत्तर प्रदेश यास रेल्वे कोच मधुन खाली उतरवून रुग्णवाहीका चालक अमोल पाटील यांचे मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृतघोषित केले असून घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मधुसूदन भावसार हे करीत आहेत.