जळगाव जिल्हा

मालमत्ता थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने आवाहन..

पाचोरा-

मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी अभय योजना नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.राज्यातील नगरपालिका/नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रामध्ये अनेक वेळा मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम जास्ती असणे, मालमत्ताधारक यांची आर्थिक अडचण असणे व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमानुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर दरमहा २ टक्के शास्ती (दंड) लावण्याचे प्रावधान आहे. यामुळे मालमत्ता धारक यांच्या एकूण थकबाकी मध्ये वाढ होऊन याचे विपरीत परिणाम कर वसुलीवर होत असल्याने यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुली करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना लागू करण्यात आली आहे. थकबाकीदार मिळकतधारकांनी मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यासाठी मिळकत कराची पूर्ण रक्कम भरावी. अभय योजना एकदाच लागू असून थकीत मालमत्ता कराच्या रकमेवरील फक्त शास्तीस (दंड) अभय योजना लागू आहे. जे मिळकत धारक शास्ती (दंड) वगळता इतर थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरतील त्यांच्या बाबतीतच शास्तीच्या (दंड) सवलतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
प्रस्ताव सादर करताना आधार कार्डची छायांकित प्रत, मालमत्ता कराची मागणी बिलाची छायांकित प्रत, संपूर्ण कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज ३१ जुलैपर्यंत नगरपरिषद कार्यालयात सादर करावा व थकीत दंड वगळता कराची इतर रक्कम तत्काळ भरून दंड माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!