राज्य

आर्थिक व्यवहारात अडकलाय इंटरनेट बार – मुंबईबाबा उर्फ नंदू पाटील.

पनवेल –

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंटरनेट डान्स बारचे प्रॉपर्टी मालक उमाकांत शहा यांनी तत्कालीन बार चालक अरुण शेट्टी यांची फसवणूक केली असल्याचे मुंबई बाबा उर्फ नंदू पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाच वर्षाचा करार करून अरुण शेट्टी यांना तिसऱ्या वर्षात जागा मालकाने प्रॉपर्टी सोडायला लावली, त्यांचा दोन वर्षाचा करार अद्यापही बाकी असून डिपॉझिट व इतर डागडुजीसाठी खर्च केलेली रक्कम ५० लाख त्यांना आजपर्यंत दिली नाही.

याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु असून जागा मालक पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे मुंबई बाबा उर्फ नंदू पाटील यांनी यावेळी सांगितले.
तक्रारदार अरुण शेट्टी यांना योग्य पध्दतीने न्याय मिळायला पाहिजे व जोपर्यंत अरुण शेट्टी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इंटरनेट डान्सबार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात यावा व उमाकांत शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही बाबा ग्रुपचे अध्यक्ष मुंबई बाबा उर्फ नंदू पाटील यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!