पाचोर्यात रंगणार खास महिलांसाठी पारंपरिक होळी-रंगपचमी उत्सव;शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फे आयोजन
पाचोरा-
हळदी कुंकवानिमित्त अतिशय बहारदार अशा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमानंतर शिवसेना-उबाठा नेत्या, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने खास भगिनींसाठी पारंपारिक होळी-रंगपचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरात सोमवार दिनांक २५ मार्च रोजी खास महिलांसाठी होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाचोर्यातील *शिवतीर्थ* मैदानावर सकाळी ८ ते ११ या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येणार असून याच्या जोडीला गीत-संगीत-नृत्याची बहारदार लयलूट असणार आहे.
या कार्यक्रमाला मतदारसंघातील महिला आणि मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले आहे.