नांदेड येथे ” वामन महाराज जन्मोत्सव”यात्रा शांततेत संपन्न
नांदेड ता.धरणगांव
नांदेड तालुका धरणगांव येथे दरवर्षी प्रमाणे 24 मार्च रोजी वामन महाराज यांचा नांदेड येथे जन्मोत्सव यात्रा भरते, असंख्य भाविकांची येथे पुजेसाठी अलोट गर्दी असते, वामन महाराज यांच्या कडे जे लोक मागणी करतात त्यांची ईच्छा पूर्ण होते अशी येथील समाधी (मंदिराची) ख्याती आहे. म्हणून येथे ईच्छूक लोक अन्नदान देणारे लोक येथे नंबर लावतात.अजुन पाच वर्षे अन्नदान देणारे लोकांची नावे बुक झाली आहेत. या “वामन महाराज जन्मोत्सव” यात्रेचे आयोजक डाॅ. पृथ्वीराज सैंदाणें नांदेड( ह.मु. चोपडा) हे येथील आयोजक आहेत, ह्या वर्षी अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम मा. दिलीपराव बळीराम नंन्नवरे सर रवंजे बु.ह.मु. अहुजा नगर जळगांव यांनी दिले आहे. आणि खास वामन महाराज यांची जन्म कहाणी (अख्यायिका) वाचण्यासाठी चोपडा येथून ललित कला केंद्र, चोपडा येथील प्रा. संजय नेवे यांच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध व्हाल अशी अख्यायिका वाचण्यात आली. नंतर महा पुजा करण्याचा मान, मा.दिलीपराव नन्नवरे ,सह पत्नीक होते, तसेच बाहेर गावावरून येणारे प्रत्येक भाविक तसेच वामन महाराज यांची बहिण कमलबाई मोरे औरंगाबाद, भाचे सतीष मोरे, प्रभाकर मोरे, विलास मोरे, भाची उज्ज्वला ब्राम्हणे पाचोरा, भाची सुनिता अंभोरे औरंगाबाद, तसेच कांदिवली वरून राजेंद्र जी सैंदाणें, अमळनेर वरून सुमनताई मोरे, सुरज संन्दानशिव, प्रा.दिलदार सैंदाणें, कमांडो कॅप्टन:- अनिल मोरे, जितेंद्र मोरे, दिपक वाघ सर, युवराज चव्हाण , जळगांव वरून भिमराव नंन्नवरे, संजय कदम, पितांबर नंन्नवरे,एरंडोल वरून अनिल सैंदाणें, पांडुरंग लाखे सोनवदकर, चोपडा वरून गौतम शिंदे, विलाससा टेके, युवराज सैंदाणें, सिध्दार्थ सैंदाणें, शिरपूर वरून मनोहर वाघ, मधुकर सोनवणे, दहिवद वरून बापु साहेब सोनवणे, औरंगाबाद वरून तहसीलदार अंभोरे साहेब, वामन मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे मालक प्रभाकर (बाळासाहेब) मोरे,
तसेच नांदेड ग्रा. पं सदस्य मा.तात्या साहेब, सुनिल चिंतामण सैंदाणें, तसेच नांदेड येथील सर्व भावकी, व गांवकरी लोक या “वामन महाराज जन्मोत्सव ” यात्रेस उपस्थित होते. हा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला.