नियमांचे उल्लंघन करत डि.जे. वाजवल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.
पाचोरा-
नियमांचे उल्लंघन करून लग्न सोहळ्यात डी.जे. वाजवल्या प्रकरणी डी.जे. मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकरणात तक्रारकर्ते निलेश उभाळे यांना धमकी दिल्या प्रकरणी नवरदेवाच्या चार चुलत भावांविरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील एका मंगल कार्यालयात पिंपळगाव येथील कुटुंबातील लग्न होते. या समारंभात विनापरवाना बेकायदेशीरपणे नियमांचे उल्लंघन करून डी.जे. वाजवत असल्याची तक्रार निलेश उभाळे, (रा. भोजे ता.पाचोरा जि.जळगाव) यांनी पोलिसांकडे केली.
पोलिसांनी लग्नसमारंभात जाऊन चौकशी केली आणि डी.जे. मालक कैलास नारायण गुजर, (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल – करण्यात आला.
निलेश उभाळे यांनी पोलिसात तक्रार दिल्याने चिडलेल्या नवरदेवाच्या चुलत भावांनी पोलिसांसमोरच उभाळे यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे उभाळे यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल – करण्यात आला.दरम्यान लग्न समारंभात पोलिस – दाखल होताच वधू-वरांकडील – नातेवाईकांची वऱ्हाडी मंडळीची एकच धांदल उडाली.