राजकीयराज्य

राष्ट्रीय स्वराज्य सेना, ना कोणती महायुती व नाही कोणती महाआघाडी करत तीसरी आघाडी करून लोकसभा -२०२४ निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवले.


मुंबई-

राष्ट्रीय स्वराज्य सेना हा महायुतीचा घटक पक्ष असतांना भारतीय जनता पार्टी वर नाराज असल्याने राजकीय पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहे २०१४ लोकसभा पासुन राष्ट्रीय स्वराज्य सेने ने भाजपा चे लोकसभा व विधानसभा व इतर सर्व निवडणूकीत भाजपा चे काम केले होते.महायुती चा घटक पक्ष असतांना सरकार मध्ये काम करण्याची संधी किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्याने नाराज मित्र पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे .यांचा फटका समविचारी मतांचे विभाजन होऊन महायुती चे उमेदवारांना बसणार असे अध्यक्षांनी या वेळेस सांगीतले.

पक्षाचे प्रमुख बागल साहेब व बहुतांश उमेदवार व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मराठा असल्याने व सरकारने ५० % च्या आत मराठा आरक्षण न दिल्याने नाराज मराठा समाज राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाला मतदान करणार असे आता गावा गावात ठराव ही होऊ लागले आहेत. मराठा व धनगर समाजाला न्याय सरकारने न दिल्याने नाराज समाज राष्ट्रीय स्वराज्य सेने चा पाठीमागे आहे असे हि या वेळेस पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी बागल म्हणाले की आमच्या पक्षाचे राज्यभरात २५ लाखापर्यंत समर्थक आहेत त्या बळावर आमचा पक्ष आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवेल पक्षाचे महाराष्ट्रात एकुण ६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाची ६५ विधानसभेत हि चांगली ताकद असल्याने येणारी विधानसभा निवडणुकीत हि उमेदवार देणार असे भाष्य ही करण्यात आले.कमीत कमी प्रत्येक उमेदवार एक लाख मतदान घेऊन युतीच्या उमेदवारा समोर अडचण करु शकतो
१) अजिंक्य साळुंखे बोडके -माढा लोकसभा मतदार संघ
२) संजय विनायक जगताप- सातारा लोकसभा
३) एडवोकेट श्रीहरी तुकाराम बागल उतर मुंबई लोकसभा ४) विकास बागल नाशीक लोकसभा क्षेत्र ५) बाळासाहेब साबळे सांगली लोकसभा. ६)सलीम शहा सभाजीनगर लोकसभा
अशी ही उमेदवारांची नावे असुन जळगाव ,अकोला, नागपूर, नांदेड ,परभणी , जालना , औरंगाबाद, पालघर , ठाणे , मुंबई उत्तर पश्चिम , मुंबई उत्तर मध्य, मुंबई ईशान्य , मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दिक्षीण मध्य, पुणे , बारामती, अहमदनगर, शिर्डी, बीड , धाराशिव ,लातुर,सोलापूर, कोल्हापूर , हातकणंगले अशा ३२ ठिकाणी हि लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत उमेदवार देउन निवडणूक लढविणार आहे असे पक्षांचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल साहेब यांनी सांगितले. या वेळेस राष्ट्रीय स्वराज्य सेने बरोबर अनेक NGO , अनेक मीत्र पक्ष , कामगार संघटना, सामाजिक संघटना एकत्र मीळुन तीसरी आघाडी तयार केली आहे. राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे सर्व उमेदवार हे उच्च शिक्षीत असुन सर्वसामान्य घरातील असुन त्याचा पाटीमागे मोठे मताधिक्य असुन सर्वसामान्य जनता पाठीमागे आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!